
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे कायमच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांना त्यांच्या विधानांवरून सुनावण्यात देखील येतं. नुकताच त्यांचा 'सत्या' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला. त्यासाठी ते मुंबईत हजर होते. मात्र आता ते एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीये. चेक बाउन्स प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आलीये. हे प्रकरण २०१८ मधील आहे.