
भारतातील सर्वात लोकप्रिय सुपरस्टार्सपैकी एक असलेला अभिनेता ऋतिक रोशन याच्या ब्लॉकबस्टर फ्रँचायझी ‘वॉर 2’ चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अक्षरशः वादळ उठलं. या चित्रपटात ऋतिक रोशन सोबत, एनटीआर, कियारा अडवाणीमुख्य भूमिकेत आहेत. मात्र य टीझरमध्ये जितकी चर्चा ज्युनिअर एनटीआरच्या लूकची झाली त्यापेक्षा जास्त चर्चा ही कियाराच्या बिकिनीची झाली. मात्र दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलंय.