
'बडे अच्छे लगते हैं' फेम राम कपूर सध्या त्याच्या 'मिस्त्री' या नवीन मालिकेमुळे चर्चेत आहे आणि त्याच्या प्रमोशन दरम्यान झालेल्या आक्षेपार्ह कमेंट्समुळेही तो चर्चेत होता. राम कपूर हा टीव्हीवरील लोकप्रिय आणि महागड्या स्टार्सपैकी एक आहे. आज त्याची गणना टीव्हीवरील सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये केली जाते. राम कपूरची एकूण संपत्ती १३५ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. आता त्याने तो दिवसेंदिवस श्रीमंत कसा होत गेला याबद्दल सांगितलं आहे.