
'सरबजीत', 'जाट' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावणारा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याच्या 'जाट' मधल्या अभिनयाचं देखील खूप कौतुक झालं. त्याच्या अभिनयसोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चांगलंच चर्चेत असतं. रणदीपने नोव्हेंबर २०२३ मध्ये लिन लैशरामसोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न मैतेई पद्धतीने झालं होतं. मणिपूरमध्ये त्यांच्या प्रथेनुसार हे लग्न पार पडलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने या लग्नातील प्रथांबद्दल सांगितलंय. त्याला लघुशंका करण्यासाठी एक वाटी दिली होती असं त्याने सांगितलंय.