
Latest Entertainment News: 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. मालिका कुठलीही असली रेश्मा हा स्टार प्रवाहच हुकुमाचा एक्का आहे. काही दिवसांपूर्वीच रेश्मा लग्नबंधनात अडकली. तिने पवनशी लग्नगाठ बांधली. अत्यंत थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मात्र रेश्माचा नवरा कोण आहे, तो काय करतो हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.