लोकांना वाटलं आम्ही हरलो... तीन कोटींची फसवणुक अन् जेल, 'रंग माझा वेगळा' फेम साईशाच्या आईने सोडलं मौन, म्हणते-

Rang Maza Vegla Saisha Mother Interview | Marathi Actress Family Shares Fraud Case And Jail Experience: 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईवर फसवणुकीचे आरोप झाले होते. त्यानंतर साईशा मालिकेतून गायब झालेली. आता अनेक वर्षांनी ती पुन्हा आली आहे.
saisha bhoir mother

saisha bhoir mother

esakal

Updated on: 

छोट्या पडद्यावरील कलाकार त्यांच्या अभिनयासाठी प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही घडलं तर त्यांची प्रसिद्धी आणखीनच वाढते. मात्र ती गोष्ट निगेटिव्ह असेल तर मात्र त्या कलाकाराचं करिअर बुडतं. असंच घडलं बालकलाकार साईशा भोईर हिच्यासोबत. 'रंग माझा वेगळा' आणि 'नवा गडी नवं राज्य' या मालिकांमधून लोकप्रिय झालेली साईशा अचानक सुरू असलेल्या मालिकेतून गायब झाली. तिच्या जागी दुसऱ्या बाल कलाकाराला घेण्यात आलं. त्याचं कारण होतं तिच्या आईवर झालेले फसवणुकीचे आरोप. आता साईशा आणि तिच्या कुटुंबाने जोरदार कमबॅक केलं आहे. आता साईशाच्या आईने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे हे कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आहे.

Loading content, please wait...