
प्रेक्षक आणि कलाकार यांचं अतूट नातं असतं. आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. तर काही प्रेक्षक तर आपल्या आवडत्या कलाकारासाठी अगदी सगळ्या मर्यादा पार करताना दिसतात. चाहते जो पर्यंत प्रेम करतायत तो पर्यंत त्या कलाकाराची लोकप्रियता टिकून राहते. अभिनेते अशोक सराफ यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. कुठेही गेले तरी चाहते आजही त्यांना गराडा घालतात. त्यांची एक झलक पाहायला चाहते उत्सुक असतात. अशीच एक घटना त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहीन ठेवलीये.