रणवीर- दीपिकाने लेकीला भेट दिली कोट्यवधींची रेंज रोव्हर; पण गाडीचा नंबर ६९६९ च का? वाचा कारण

Ranveer Singh Deepika Padukone New Car: लोकप्रिय बॉलिवूड कलाकार रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी आपल्या लेकीसाठी रेंज रोव्हर गाडीची खरेदी केली आहे.
ranveer singh dipika padukone
ranveer singh dipika padukone esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी. त्यांनी कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या आयुष्यात एक चिंकली गोंडस परी आली. ८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिकाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. आता या जोडीने आपल्या लेकीसाठी नवीकोरी गाडी खरेदी केल्याचं बोललं जातंय. त्यांच्या या गाडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रणवीर आणि दीपिका यांनी गडद हिरव्या रंगाची रेंज रोव्हर खरेदी केली आहे. या गाडीचा नंबरही ६९६९ आहे. त्यामागेही एक कारण आहे.

दीपिका आणि रणवीर यांच्या घरात चिमुकल्या परीचं आगमन झालंय. त्यातच त्यांनी नवीकोरी गाडी घेतली आहे. या रेंज रोव्हरची किंमत मुंबईत ४ कोटी ७४ लाख आहे. ही रेंज रोव्हर ४. ४ एलडब्ल्यूबी रणवीरच्या गाड्यांच्या कलेक्शनमधली चौथी गाडी आहे. मुलीच्या जन्माच्या काही आठवड्यांनंतर ही गाडी घेतली गेलीये. ८ ऑक्टोबर रोजी या गाडीचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं होतं. या गाडीवरही रणवीरचा आवडता नंबर ६९६९ आहे. आता असं का असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा क्रमांक आपल्यासाठी लकी आहे असं रणवीरचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्या गाड्यांचा नंबर देखील ६९६९ आहे.

तर नेटकरी ही गाडी पाहून ती मुलींसाठी भेट आहे का अशी विचारणा करत आहेत. मुलीच्या जन्मानंतर त्यांची ही मोठी खरेदी आहे तर चाहते सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यांने आपल्या मुलीच्या जन्माची बातमी सांगत म्हटलेलं, 'बाप झालो रे'. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं तर रणवीर आणि दीपिका दोघेही आता ''सिंघम अगेन मध्ये दिसणार आहे.

ranveer singh dipika padukone
दारापुढे, पाटापुढे झटपट... रात्री २ वाजता ऐकलेल्या व्हिडीओचं यशराज मुखातेने बनवलं रांगोळी रॅप, तुम्ही ऐकलंत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com