
प्रसिद्ध रॅपर, संगीतकार आणि डान्सर रफ्तारने दुसरं लग्न केलंय. दिलीन नायर उर्फ रफ्तारने शुक्रवार, ३१ जानेवारी २०२५ रोजी स्टायलिस्ट आणि अभिनेत्री मनराज जावंदाशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे पहिले फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये रॅपर मंडपात आपल्या प्रेयसीच्या गळयात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. रफ्तारने त्याची माजी पत्नी कोमल वोहरापासून घटस्फोट घेतल्यानंतर पाच वर्षांनी दुसरं लग्न केलंय.