

STARP RAVAH NEW SERIAL
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीवरील मालिकांचा समावेश आहे. स्टार प्रवाहने महिन्याभरापूर्वी ८ नव्या मालिकांची घोषणा केलेली. त्यात 'आमच्या लाडक्या नाईकबाई' आणि 'आता होऊ दे धिंगाणा' यांचा समावेश होता. त्यानंतर 'मी कात टाकली', 'मराठी मिडीयम' या मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. अशातच आता आणखी एका मालिकेची घोषणा स्टार प्रवाहकडून करण्यात आलीये. ही मालिका आहे 'तुझ्याकडे तुला मागणे'. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय.