
Marathi Serial Updates: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ''नवरी मिळे हिटलरला' आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. काही दिवसात या मालिकेचे शेवटचे भाग प्रसारित होणार आहेत. त्यातही ही मालिका बंद होणार म्हणून प्रेक्षक नाराज आहेत. झी मराठीच्या गाजलेल्या मालिकांपैकी एक असलेली ही मालिका आता बंद होणार आहे हे समजताच प्रेक्षकांकडूनही मालिका बंद करू नका अशी मागणी करण्यात आली. आता या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या एजे म्हणजेच अभिनेता राकेश बापट याच्या आईने देखील मालिका संपण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.