
'अखियों से गोली मारे' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नायिका म्हणजे रवीना टंडन. तिने ९० च्या दशकात अनेक हिट चित्रपटात काम केलं. तिच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत. ती नुकतीच 'घुड चढी' या चित्रपटात दिसली होती. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. रवीनाचा तिच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय ज्यात ती मुलीला ओरडताना दिसतेय. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.