
Bollywood News : रवीना टंडनची कन्या राशा थडानी हिने ‘आझाद’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं असून, तिच्या सहज अभिनयासोबतच ‘उई अम्मा’ या गाण्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दुसरीकडे, ‘मुंज्या’मधील आपल्या लक्षवेधी भूमिकेसाठी चर्चेत आलेला अभय वर्मादेखील सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतो आहे. त्याच्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे आणि बॉय-नेक्स्ट-डोअर चार्ममुळे तो तरुणाईत लोकप्रिय ठरत आहे.