

Rashmika Mandanna
sakal
मागच्याच महिन्यात विजय देवरकोंडा सोबत लग्न करत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या चाहत्यांना खूश केलं होतं. त्यानंतर लगेच तिने पती विजय देवरकोंडासोबतचा नवीन सिनेमा जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. इतकंच पुरेसं नव्हतं तर आता लगेचच रश्मिकाकडून आणखी एक मोठं सरप्राईज समोर आलं आहे. बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या एका फेमस चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचा फर्स्ट लूकही नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये या नव्या प्रोजेक्टबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.