
Entertainment News: छोट्या पडद्यावर अशा अनेक लोकप्रिय मालिका होऊन गेल्या ज्यांची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिली. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलेलं. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडलं होतं. मात्र पुढे दुसऱ्या सीझनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरी उतरेनाशी झाली. याच मालिकेतील लोकप्रिय ठरलेलं पात्र म्हणजे वच्छी. अण्णा नाईकाला टक्कर देणारी एकमेव होती ती वच्छी. मात्र अचानक हे पात्र मालिकेत मृत दाखवण्यात आलं. आता त्यामागचं कारण समोर आलंय.