
Entertainment News: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक दिलीये. गेल्या आठवड्याभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ९०० कोटींचा आकडा पार केलाय. हा चित्रपट खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या मनावर राज्य करतोय. 'पुष्पा २: द रुल' ने कमाईचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेत. मात्र 'पुष्पा २' च्या या यशात काही अंशी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिच्या पतीचाही वाता आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? 'पुष्पा २' मुळे सध्या रवीनाचे पतीही चर्चेत आहेत. कारण काय?