रवीना टंडनची एक चूक अन् रातोरात स्टार झाली राणी मुखर्जी! अभिनेत्रीने शाहरुखचा ब्लॉकबस्टर चित्रपट का नाकारला?

Karan Johar And Raveena Tandon Controversy: राणी मुखर्जीच्या आधी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिला एक चित्रपट ऑफर झाला होता. मात्र तिने या चित्रपटाला नकार दिला.
RAVEENA TANDON

RAVEENA TANDON

ESAKAL

Updated on

बॉलिवूडमध्ये एक चित्रपट दुसऱ्या अभिनेत्रीने करणं काही नवीन नाही मात्र तो चित्रपट जर हिट ठरला तर मात्र त्या कलाकारांना चित्रपटाला नकार दिल्याचा पश्चाताप होतो. असंच काहीसं घडलं रवीना टंडनसोबत. करण जोहरच्या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांपैकी एक असणारा 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत आहे. या चित्रपटातील 'टीना' या पात्रासाठी राणी मुखर्जीच्या आधी रवीनाला विचारणा झाली होती. मात्र तिने या भूमिकेला नकार दिला. आता एका मुलाखतीत तिने त्याचं कारण सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com