
बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमाचे त्रिकुट दिसले. ८०-९० च्या दशकापासून आजपर्यंत, असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. यामध्ये एक नाव रवीना टंडनचं देखील आहे. रवीना आज अनिल थडानीची पत्नी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तिचा साखरपुडा अक्षय कुमारशी झालेला. ती अजय देवगनसोबत रिलेशनमध्ये होती. एकेकाळी इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचं करिश्मा कपूरमुळे इतका वाईट ब्रेकअप झाला की तिने करिश्माला खूप शिव्याशाप दिलेले.