
'नटरंग', 'टाइमपास' यांसारख्या एकाहून एक उत्कृष्ट चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलीये. रवी जाधव यांनी नवीन घर घेतलंय. त्यांनी नुकताच त्यांच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केलाय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या घरात वास्तुशांत केली. आता त्यांनी त्या पूजेचा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्यांच्या घराचं कौतुक करत आहेत. त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.