'नटरंग'नंतर १७ वर्षांनी 'ती' येतेय; रवी जाधव यांच्या 'फुलवरा' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी थिएटरमध्ये धडकणार

Ravi Jadhav Phulwara Marathi Movie Teaser Release: लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'फुलवरा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचा टीझर समोर आलाय. सोबतच प्रदर्शनाची तारीखही सांगण्यात आलीये.
phulwara

phulwara

esakal

Updated on: 

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. या संत भूमीत कलेला खरी दाद मिळाली. लावणी म्हटलं की अदा, अदब आणि नजरेनेच घायाळ करणं. लावणीचा फाड लागला की घुंगरांचा आवाज ऐकून अनेक पावलं आपोआपच त्या दिशेने चालू लागायची. मराठी सिनेसृष्टीत अनेक लावणीवर अनेक सिनेमे सादर करण्यात आले. 'पिंजरा' असो किंवा १७ वर्षांपूर्वीचा 'नटरंग'. लावणीला प्रेक्षकांनी कायमच भरभरून प्रतिसाद दिलाय. रवी जाधव यांच्या 'नटरंग' सिनेमाने तर इतिहास रचला होता. आता रवी जाधव याच लावणीला आणखी एक साज चढवणार आहेत. रवी जाधव यांच्या 'फुलवरा' सिनेमाचा पहिला टीझर नुकताच समोर आलाय.

Loading content, please wait...