

fandry movie song story
esakal
२०१४ मध्ये आलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' या चित्रपटाने इतिहास रचला होता. या चित्रपटाने एक वेगळंच भावविश्व प्रेक्षकांसमोर मांडलं. वास्तवाची सगळ्यांना जाणीव करून दिली. हा चित्रपट गाजला तितकंच या चित्रपटातील 'तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला' हे गाणंही गाजलं. हे गाणं आजही प्रेक्षकांना तितकंच आवडतं. मात्र या गाण्यामागे एक हटके कथा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक रवी जाधव यांनी या गाण्यामागची कथा सांगितली आहे.