
'हम आपके है कौन' मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. रेणुका यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलंय. त्यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली. त्यांच्या हसण्यावर आजही कित्येक चाहते फिदा आहे. रेणुका त्यांच्या कामासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यांनी हिंदी अभिनेते आशुतोष राणा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र पहिल्याचं गरोदरपणात त्यांना अनेक दडपण आणणारे अनुभव आले.