
लोकप्रिय मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस हिचे पुर्वश्रमीचे पती आणि लोकप्रिय हिंदी अभिनेते संजीव सेठ यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीपासूनही घटस्फोट घेतला. ते दुसऱ्या पत्नीपासूनही वेगळे झाले. संजीव आणि त्यांची दुसरी पत्नी लता सबरवाल यांनी ' ये रिश्ता क्या कहलाता हैं' मध्ये अक्षराच्या आई- वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र आता लग्नाच्या १६ वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता आपल्या दुसऱ्या घटस्फोटावर संजीव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.