
सध्या मराठी आणि हिंदी सगळ्याच अभिनय क्षेत्रातील कलाकारांच्या घटस्फोटाची संख्या वाढली आहे. लग्नाच्या १५- २० वर्ष सोबत राहून हे कलाकार आपल्या पार्टनरपासून वेगळे होतात. त्यामागचं स्पष्ट कारण प्रेक्षकांना सांगत नसले तरी प्रेक्षकांना मात्र हे ऐकून चांगलाच धक्का बसतो. आता या यादीमध्ये हिंदी मालिकाविश्वातील आणखी एका जोडीचं नाव घ्यावं लागेल. अभिनेत्री रेशम टिपणीस हिचे पूर्वाश्रमीचे पती संजीव सेठ यांचं दुसरं लग्न देखील मोडलं आहे. त्यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री लता सबारवाल हिने एक पोस्ट करत ही माहिती दिलीये. ही बातमी ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.