मालिकेने निरोप घेताच नवी सुरुवात; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची लगीनघाई; ग्रहमखचे फोटो व्हायरल

Popular Marathi Actress Revati Lele Wedding: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या ग्रहमखचे फोटो व्हायरल झालेत.
revati lele

revati lele

esakal

Updated on

सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचा सीझन सुरू आहे. अनेक कलाकार आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत. तर काही कलाकारांनी लग्नगाठ बांधत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा नेमळेकर हिने लग्नगाठ बांधत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता तिच्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ही अभिनेत्री आहे 'रेवती लेले. रेवती तिच्या 'लग्नाची बेडी' या मालिकेसाठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आता तिने तिच्या ग्रहमखचे फोटो शेअर केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com