

asha movie review
ESAKAL
भारतीय समाजरचनेचा महिला एक महत्त्वाच्या दुवा आहेत. त्या केवळ घरापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत तर सगळ्याच क्षेत्रामध्ये हिरीरीने पुढाकार घेत आहेत. आज त्या समाजाच्या तळागाळात पोहोचून बदल घडवणाऱ्या खऱ्या नायिका बनल्या आहेत. अशाच निःस्वार्थ सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या महिलांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे आशा सेविका. भारतीय ग्रामीण आरोग्य सेवेचा त्या एक महत्त्वाचा कणा आहेत. गावा-गावामध्ये, वस्त्या-वस्त्यांमध्ये आरोग्यसेवेचा आधार बनून उभ्या राहिलेल्या या महिला अनेकदा स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून समाजासाठी झटताना दिसतात. त्याच महिलांचा अर्थात आशा सेविकांचा एकूणच संघर्ष, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती त्यांची असलेली जबाबदारी संवेदनशीलपणे उलगडणारा चित्रपट म्हणजे आशा हा चित्रपट.