

rinku rajguru
esakal
पावसाळा सुरू झाला की प्रत्येक मराठी मनाला पंढरीच्या वारीचे वेध लागतात. यंदाची ही वारी अधिक खास करण्यासाठी 'सैराट' फेम लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रिंकूचे वारीतील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यामुळे ती काहीतरी नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून रिंकूने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.