
सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत.