

rise and fall 2 fight
esakal
‘राइज अँड फॉल सीजन 2’चा तिसरा एपिसोड चांगलाच चर्चेत आला आहे. शोमध्ये टीममेट्समधील वाद थेट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. राइज अँड फॉल सीजन 2’मध्ये (Rise and Fall 2) तिसऱ्याच एपिसोडमध्ये टीममेट्समध्ये जोरदार वाद पाहायला मिळाला. शहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) आणि सिवेत तोमर (Siwet Tomar) यांच्यातील वाद इतका वाढला की प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलं. या झटापटीत शहजाद यांचे कपडे फाटले आणि ते जमिनीवर पडले. या घटनेनंतर सिवेत तोमरला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.