
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. त्याच्या 'वेड' ने प्रेक्षकांना वेड लावलं. रितेश नुकताच 'रेड २' या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याची या चित्रपटातील नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तर त्याच्या चित्रपटांइतकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. त्याची आणि अभिनेत्री जिनिलिया दशमुख यांची जोडीही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. त्यांचं वागणं आणि त्यांचं एकमेकांवरचं प्रेम स्पष्ट दिसून येतं. त्यांची केमिस्ट्री, त्यांचं कपल हे अनेकांसाठी आदर्श आहे. आता रितेश आणि जिनिलियाचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.