
आपल्या अभिनयाने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रितेशने २०२४च्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीच 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं होतं. आता या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालंय. त्याच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या सेटवरच्या काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत ज्यात त्याचा फर्स्ट लूक समोर आलाय.