Kakuda: छोटा दरवाजा उघडा ठेवा नाहीतर... 'मुंज्या'नंतर आता 'ककुडा येणार भेटीला; ककुडा म्हणजे आहे तरी काय?

Kakauda Movie Ott: 'मुंज्या' या चित्रपटानंतर आता 'ककुडा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
kakuda movie
kakuda movie sakal

मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्समधील 'स्त्री' , 'भेडिया' आणि 'मुंज्या' या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. 'मुंज्या'ने तर १० दिवसात ६० कोटींहून जास्त कमाई केली. मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने आपल्या दिग्दर्शनाने सगळ्यांना खिळवून ठेवलं. आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरावयाला सज्ज झाला आहे. तो आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'ककुडा'. अभिनेता रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. वाचा काय आहे हा 'ककुडा'.

'ककुडा' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये संध्याकाळचे ७ वाजले आहेत. घड्याळावर कुणाची तरी सावली दिसते. एक छोटा दरवाजा दिसतोय आणि एक मोठा. त्यातील छोट्या दरवाज्यावर ठकठक होते आणि कुणाचे तरी लटकलेले पाय दिसतात. हा टीझर शेअर करत त्यांनी लिहिलंय, ' ककूडा'च्या येण्याची वेळ झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी ७. १५ वाजता. दरवाजा उघडायला विसरू नका कारण प्रत्येक पुरुषाला धोका आहे.'

काय आहे चित्रपटाची कथा?

या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशातील एका गावातील आहे, जिथे अनेक वर्षांपासून एक शाप आहे. इथे घराला दोन दरवाजे आहेत. एक मोठा आणि दुसरा लहान. येथे दर मंगळवारी संध्याकाळी 7.15 वाजता छोटा दरवाजा उघडा ठेवला जातो आणि जो असे करत नाही त्या घरातील मुख्य पुरुषाला शिक्षा दिली जाते. ककुडा कोण आहे आणि हा विधी न केल्याबद्दल शिक्षा का आहे आणि हे गाव या शापापासून मुक्त होईल का? हे प्रश्न तुम्हाला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळतील. 'मुंज्या' नंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

kakuda movie
Kranti Redkar: दुसऱ्या जातीत लग्न केल्यावर आयुष्यात काय बदल झाला? क्रांती रेडकर म्हणाली, 'पहिल्याच दिवशी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com