आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Riteish Deshmukh On Raja Shivaji Movie: अभिनेता रितेश देशमुख याने नुकत्याच पार पडलेल्या सकाळ सन्मान सोहळ्याला हजेरी लावली होती. यात बोलताना त्याने आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटाबद्दल भाष्य केलं.
riteish deshmukh

riteish deshmukh

esakal

Updated on

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याने प्रत्येक चित्रपटात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. त्याने 'वेड' या चित्रपटयांतून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. लवकरच तो 'राजा शिवाजी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यात तो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. नुकताच सकाळ सन्मान सोहळा २०२६ पार पडला. यात त्याला पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने सकाळ प्रीमिअरला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आगामी 'राजा शिवाजी चित्रपटाबद्दल भाष्य केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com