
लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या सेटवर एक दुर्घटना घडली होती. साताऱ्याजवळ या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना त्यांच्या क्रूमधील एक कलाकार गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. सेटवर घडलेल्या या दुर्घटनेची माहिती सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर करण्यात आली होती. मात्र तेव्हा त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. आता अखेर ३६ तासांनी त्याचा मृतदेह हाती लागलाय.