
महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी हिंदी वाद सुरू आहे. सरकारने हिंदी सक्ती केल्याने मराठी भाषिकांनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर मुंबईत मोठं आंदोलन उभं राहिलं. या गोष्टीसाठी अनेक कलाकारांनी देखील पाठिंबा दिला होता. त्यात रितेश देशमुखही होता. आता रीलस्टार पुनीतने रितेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिलीये. सोबतच त्याला डिवचलं आहे. त्याने हा व्हिडिओ दाखवत रितेशने हिंदी भाषेचा अपमान केलाय असं म्हटलंय.