सायबर कॅफेतून सुरू झाला प्रवास, २७-२८ चित्रपटांचा अनुभव; आता रोहन शाह करणार निर्मितीची नवी सुरुवात

ROHAN SHAH NEW JOURNEY: कार्यकारी निर्माता म्हणून दोन दशकांचा अनुभव; रोहन शाह आता घेऊन येणार स्वतःचा मराठी चित्रपट
ROHAN SHAH

ROHAN SHAH

ESAKAL

Updated on

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टीत कार्यकारी निर्माता म्हणून काम केलेले रोहन शाह आता स्वतः निर्माता म्हणून नवी सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत. जवळपास २७ ते २८ मराठी चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत कार्यकारी निर्माता म्हणून काम करताना त्यांनी चित्रपटाच्या पडद्यामागील अनेक बारकावे जवळून अनुभवले आहेत. आपल्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल सांगताना रोहन शाह यांनी सांगितले की, साधारण २००३ ते २००६ या काळात ते शाळेच्या सुट्टीत एका सायबर कॅफेमध्ये पार्टटाइम काम करत होते. त्याच सुमारास दोन-तीन लेखक आणि दिग्दर्शकांची एक टीम चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनच्या कामासाठी त्या सायबर कॅफेमध्ये येत असे. त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर शाह त्यांना प्रिंटआउट काढणे आणि इतर छोट्या-मोठ्या कामांमध्ये मदत करू लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com