
आपल्या हक्काच्या घरात राहणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी आपल्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. काहींनी मुंबईत घर घेतलं तर काहींनी पुण्यात. कुणी फार्महाउस बांधलं तर कुणी आपल्या स्वप्नांचा बंगला. अशातच आणखी एका अभिनेत्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालंय. मराठी अभिनेत्याला त्याच्या हक्काचं घर मिळालंय. या अभिनेत्याला म्हाडाची लॉटरी लागली आहे. त्याच्या मुलीने एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिलीये. सोबतच तिने गृहप्रवेशाचे फोटोही शेअर केलेत.