
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हिने स्वतःच्या हिमतीवर अभिनय क्षेत्रात स्वतःचं नाव निर्माण केलं. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचीदेखील चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा असते. ती मालिकांमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने हिंदी मालिकांमध्येही आपलं नाव कोरलंय. ती लवकरच नवीन मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र रुपाली किती शिकलीये तुम्हाला ठाऊक आहे का? तिने दहावीदेखील केली नसल्याचं तिने सांगितलं.