
आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रिया पिळगावकर चाहत्यांची लाडकी आहे. अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी असूनही तिने कधीही त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला नाही. तिने स्वतःच्या मेहनतीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ती 'ताजा खबर', 'गिल्टी माईंड', 'द ब्रोकन न्यूज', 'ड्राय दे', 'कादन' सारख्या सीरिज आणि चित्रपटात दिसलीये. ती लवकरच 'छळ कपट' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने जितेंद्र यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितलाय.