

sachin pilgaonkar
esakal
वयाच्या चौथ्या वर्षांपासून अभिनयाची सुरुवात करणारे लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर याची लहान असतानाच चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं. ते उत्तम लेखक, अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी आज्ज्वर अनेक कामं केलीयेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही आपलं स्थान निर्माण केलं. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक अजरामर चित्रपट दिले. मात्र कामाचा आवाका इतका असूनही सचिन सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतात. ते त्यांच्या आठवणी मुलाखतीमध्ये सांगताना दिसतात. मात्र प्रेक्षकांना ती अतिशोयोक्ती वाटल्याने ते अभिनेत्यांना ट्रोल करतात. आता अखेर सचिन यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलं आहे.