
अभिनेते सचिन पिळगावकर यांनी फार कमी वयात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी आपण दिग्दर्शक होणार असल्याचं ठरवलं. त्यांनी 'अशी ही बनवाबनवी, 'माझा पती करोडपती, 'नवरा माझा नवसाचा' अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. सोबतच त्यात अभिनयही केला. मात्र सध्या त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. ज्यात ते मोठमोठ्या व्यक्तींसोबतच्या त्यांच्या आठवणी सांगतायत. मात्र यावरून ते ट्रोल होताना दिसतायत. असाच आणखी एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर पाहायला मिळतोय ज्यात ते चक्क महाभारताबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर देतायत.