
गेली कित्येक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अनेक हिट चित्रपटात काम केलं. त्यांनी उत्तम अभिनयासोबतच अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. मराठीसोबतच हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची छाप पडणाऱ्या सचिन यांनी आता आपल्याला कुणीही अभिनेता म्हणून विचारत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.