
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांचे रंजक किस्से नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. त्यांचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी 1963 साली प्रदर्शित झालेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाशी संबंधित एक मजेदार आणि अविश्वसनीय किस्सा शेअर केला आहे. एका रेडिओ मुलाखतीदरम्यान त्यांनी हा अनुभव सांगितला, ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.