ashi hi banvabanvi 2
ashi hi banvabanvi 2sakal

Ashi Hi Banwa Banwi 2: 'नवरा माझा नवसाचा २' नंतर 'अशी ही बनवाबनवी'चा दुसरा भाग येणार? सचिन पिळगावकरांनी स्पष्टच सांगितलं

Sachin Pilgaokar On Ashi Hi Banwa Banwi 2: 'अशी ही बनवाबनवी'चा दुसरा भाग येणार का? या प्रश्नावर सचिन पिळगावकरांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

Ashi Hi Banwa banwi Sequel: ९० च्या दशकातील प्रचंड गाजलेला प्रेक्षकांना खळखळून हसवणारा चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या चित्रपटातील संवाद आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असतात. चित्रपटातील लिंबू कलरची साडी असेल किंवा हा माझा बायको पार्वती, धनंजय माने इथेच राहतात का असे अनेक कधीही विस्मरणात न जाणारे संवाद असतील, या चित्रपटाच्या प्रत्येकाच्या आपल्या अशा काही आठवणी आहेत. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सिद्धार्थ रे आणि सचिन पिळगावकर असे दिग्गज अभिनेते होते. या चित्रपटाचादुसरा भाग यावा अशी अनेकांची इच्छा होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार का , या प्रश्नावर सचिन यांनी उत्तर दिलं आहे.

लक्ष्याशिवाय सिनेमा नाही

सचिन हे लवकरच 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. नुकतीच सचिन यांनी रेडिओ सिटीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना 'अशी ही बनवाबनवी'च्या सिक्वेलबद्दल विचारण्यात आलं. याबद्दल बोलताना ते म्हणाले, 'हा सिनेमा लक्ष्याशिवाय नाही बनू शकत. फक्त लक्ष्या नव्हे तर सुशांतची भूमिका साकारलेला सिद्धार्थदेखील नाहीये. सुधीर जोशी, वसंत सबनीस, अरुण पौडवाल, शांताराम नांदगावकर असे 'अशी ही बनवाबनवी'च्या टीममधील अनेक लोक आज आपल्यात नाहीत. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान होतं. त्यामुळे ही मंडळीच नाहीत तर सिनेमा पुढे जाऊ शकत नाही.'

सचिन पुढे म्हाणाले, 'काही काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात. त्यापलीकडे त्या असतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. हा चित्रपट मी बनवलाय, असं मी म्हणूच शकत नाही. हा चित्रपट आम्ही एकत्र येऊन बनवला आणि लोकांनी तो मोठा केला. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग बनू शकत नाही.'

ashi hi banvabanvi 2
Anil Kapoor: बिग बॉस विजेत्या अभिनेत्रीला नाही आवडली अनिल कपूर यांची होस्टिंग; म्हणते- झक्कास वाल्यांची जागा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com