
मराठी सिनेसृष्टीतील कल्ट चित्रपटांपैकी एक असणारा 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपत आजही तितकाच लोकप्रिय आहे. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की प्रेक्षक तो आवडीने बघतात. या चित्रपटाने कित्येक प्रेक्षकांचं बालपण सोनेरी बनवलं. 1988 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत बक्कळ कमाई केली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं होतं. या चित्रपटातले कित्येक डायलॉग अजरामर झाले. मग ते 'माझा बायको पार्वती' असो किंवा 'सारखं सारखं त्याच झाडावर काय?', 'धनंजय माने इथेच राहतात का?' यांसारखे संवाद असोत. मात्र या चित्रपटाच्या सेटवर असं काहीतरी घडलं होतं ज्यासाठी लक्ष्मीकांत यांना सचिन यांच्याकडे विनंती करावी लागलेली.