
आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आपल्या आवाजानेच समोरच्याला गार करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात देखील काम केलं. मात्र अमरापूरकर यांना सिद्धार्थ जाधव मुळीच आवडत नव्हता. त्याला पाहिल्यावरच त्यांना इंसेक्युरिटी वाटायची असा खुलासा लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केलाय. एका चित्रपटादरम्यान सदशिव अमरापूरकर सिद्धार्थ जदवशी कसे वागायचे याचा खुलासा महेश यांनी मुलाखतीत केलाय.