

akash nalawade wife dohale jevan
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. आकाश लवकरच बाबा होणार आहे आणि नुकतंच त्याच्या पत्नीचं डोहाळे जेवण मोठ्या थाटात पार पडलंय. आकाश सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो त्याचे आणि कुटुंबाचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. आकाशने काही महिन्यांपूर्वीच चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. आता मोठ्या थाटामाटात पत्नीचं डोहाळेजेवण पार पडलंय. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होतायत.