
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सईने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. गेली वर्षभरात तिने 'अग्नी', 'मानवत मर्डर्स', 'श्रीदेवी प्रसन्न', 'भक्षक' असे एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपट तिने चाहत्यांना दिले. या वर्षीही ती अनेक चित्रपट आणि सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र आता सईचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यात ती एका हॉलीवूड अभिनेत्यासोबत दिसतेय. हा व्यक्ती नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.