
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आजवर पडद्यावर अनेक दमदार भूमिका साकारल्यात. तिने 'दुनियादारी' ते 'गुलकंद' अशा अनेक चित्रपटातुन प्रेक्षकांच्या मनात घर केलं. २ वर्षांपूर्वीच तिने तिचं हक्काचं घर घेतलंय. 'हंटर' ते 'डब्बा कार्टेल' अशा अनेक हिंदी चित्रपट आणि सीरिजमध्ये ती दिसली. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी सई आता एका ६१ वर्षीय अभिनेत्याच्या फोटोने घायाळ झालीये.