
स्त्री ही सिनेसृष्टीतील असो, कुठल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला जाणारी असो किंवा घरकाम करणारी असो प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात कधीना कधी छेडछाडीला सामोरं जावं लागतं. बस, ट्रेन किंवा अगदी रिकाम्या जागीदेखील मुलींना अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील अशा प्रसंगाचा सामना केलाय. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची झोप उडवणाऱ्या सईने मुलाखतीत तिचा बसमधला अनुभव सांगितलाय.